पंखपार: 2015

Sunday, March 29, 2015

कागदाची होडी

थेंब अवचित आले पावसाचे दारी
चिंब झाले शब्द माझी ओलावली गाणी
आली गंधाळली माझ्या अंगणी भिंगोरी
मन झाले वारा, मन झाले पाणी
मन धावते वढाळ, मन कागदाची होडी

थेंब अवचित आले आली पापण्यास स्मृती
गळा भरल्या मेघात विज हुंदक्यास भेटी

असा नाचतो पाऊस चाल थेंबाळते माझी
मन झाले रान, मन झाले शीळ  
मन अभ्रकाचे फुल, मन उन्हाची पाकोळी

थेंब अवचित आले आली पाखरे सुखाची
सावलीस फुटे त्यांच्या पालवी आशेची-भीतीची