सुख टाळी द्यायला सरसावते
आणि त्याच वेळी जपायचे असतात मला हातवरचे फोड
चाके लाऊन किल्ली देउन तयार असते माझे मन
एका लाँग ड्राईव्ह करता
आणि काही केल्या बंद होत नाहीत ह्या खिडक्या
ही दारे, घरातले दिवे आणि पत्रासाठीच्या फटीतुन
ओतत रहातात थकलेली बिले...
उपसत रहातो मी घर थोडे पाय टेकवण्यासाठी
मन शोधत रहाते फट माझ्या कर्दळ-कातडी मधे
एक उंची वाइन सरकवतो घशात लाच म्हणुन कदाचीत लाचार म्हणुन देखील
पण लय संपलेल्या क्षणाशी मन उभे असते
सुन्न विकल...
निसर्गाने दिलेली नखे घासत, रंगवत.
सुखाचे मुखवटे जगोजाग सजवतात भिंती कोपरे
आणि वेश्येसारखे माझे मन सरावने
चाके लाऊन किल्ली देउन तयार पुन्हा एका लाँग ड्राइव्हसाठी
No comments:
Post a Comment