पंखपार: संगीतबद्ध केलेल्या काही रचना

संगीतबद्ध केलेल्या काही रचना

मायबोली गणेश-उत्सवाच्या निमित्ताने मी लिहिलेल्या व योगेश जोशी ह्याने संगीतबद्ध केलेल्या ह्या रचना. ऐका व आवडल्यास जरूर अभाप्राय कळवा. 

  • संगीतकार (योगेश) मनोगतः "गणा गणा" चा गजर ऐकणार्‍याच्या मनात अन आसमंतात घुमत रहावा हाच फोकस ठेवून ही रचना केली होती... स्टुडियोतील वादक मंडळींन्ना हे गीत वाजवताना खूप मजा आली.. आजकाल अशा प्रकारचे लोकगीताचा बाज असलेले काम कमी झाले आहे असे त्यांचे म्हणणे होते.

गणा गणा गणा : गणपतीचा गजर 


  • संगीतकार (योगेश) मनोगतःकवितेचे शब्द व मीटर नेहेमीपेक्षा थोडे वेगळे वाटले. फार बोजड वा अलंकारिक शब्द नाहीत पण सरळ सोट साधे शब्द जे एखाद्या भक्ताच्या मनात येतात तसे "सच्चे" वाटले.. म्हणून ऊगाच न बदलता तसेच ठेवतो आहे. श्री गणरायाच्या कृपेने यातून एखादी "कजरी" बसवता येईल का असे सुचले. कजरी म्हणजे थोडक्यात भोजपूरी भजन/गवळण/ समूह गानाचा प्रकार. यात शब्द वा भाव या इतकेच किंवा पेक्षा थोडे जास्ती महत्व हे ताल, साज, वाद्य याला असते. खरे तर एकत्र बसून मस्त कीर्तन करायचा हा प्रकार असतो. यात तबला, ढोलक, नाल, कंजिरी, करताल, डफली, अशा "ताल" प्रधान वाद्याचा वापर असतो. शिवाय रचनेमध्ये एक प्रकारचा "झोल" असतो. म्हणजे मूळ रिदम चालू असला तरी त्यात मध्ये मध्ये ब्रेक येतात (मुखडे किंवा छोट्या तोडी..). त्यातून एक विशीष्ट लय, नाद तयार होतो. सहसा चढ्या आवाजात/वरच्या पट्टीत व मुख्य पुरूष गायक मंडळीच हे गातात. समूहातील इतर लोकही त्यात मुख्यत्वे टाळ्या वाजवणे, धृवपद म्हणणे, हारमनी मध्ये तान घेणे वगैरे योगदान देतात. सहसा कजरीचा मूड, स्वर चढेच असतात.. पण इथे शेवटच्या कडव्यात मी मुद्दामून थोडा शिवरंजनी चा वापर केला आहे. त्या कडव्यातील शब्व्दांचे गांभीर्य व भाव दोन्ही त्यातून प्रतीत होतात असे वाटते. 

गणा ये गणा ये : एक कजरी 

No comments:

Post a Comment